मराठी व्यावसायिक मंडळ न्यास उज्जैन

स्थापना:- एक मेका सहाय्य करू, अवघे घरू सुपंथ ह्या अभंगाच्या मूलमंत्रावर मराठी भाषी मेडिकल रिप्रेजेन्टेटिव, बीमा अभिकर्ता, चिकित्सक, चार्टर्ड अकाउन्टेन्ट, कर सलाहकार ह्यांनी मिळुन मराठी प्रोफेशनल गु्रप ची स्थापना दिनांक 13.9.1998 रोजी केली । मराठी भाषी महण्जे मराठी साहित्य आणि संस्कृति ची सत्यनिष्ठे ने जोपासना करणारा । हे वाक्य गृहित धरून गु्रप नी सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा चा प्रकल्प हाथी घेतला ।
मराठी व्यावसायिक मंडळ न्यास द्वारा विभिन्न चिकित्सा क्षेत्रात मोफत चिकित्सा शिविर, औषधांचे वाटप करण्यात आले । मूक बधीर शाळा आणि छात्रावास तसेच किशोर गृह नागझिरी येथे 170 निराश्रित मुलांचे, रेल्वे स्टेशन येथील कुली यांचे नेत्र परीक्षण इत्यादि शिविर मधे चेकअप करून औषधि वाटप करण्यात आली तसेच किशोर गृह येथील मुलांना सहा महिन्याचे औषघ मोफत दिले व औषध व्यापारी आणि बलसारा च्या सहायता ने किशोर गृह च्या 170 मुलांना पेस्ट आणि टूथब्रश उपहार दिले । किशोर गृह, मुक बधीर शाळा येथील मुलांना मिठाई, पुस्तक, नवीन कपडे, खेळणी तसेच ह्या मुलांचे व नानाखेडा सेवा बस्ती मधे गरीब मुला-मुलींन करता चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली ह्यात 200 मुला-मुलींनी भाग घेतला ।
न्यास द्वारा वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रम, मालवा क्षेत्रीय कथाकथन स्पर्धा, एकल अभिनय स्पर्धा, मालवा क्षेत्रीय एकल वाद्य स्पर्धा तसेच मुंबई  चे प्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध कथाकथनकार संजय उपाध्ये, प्रतिद्ध कलावंत विसुभाउ बापट, प्रसिद्ध एकार्डियन वादन श्री अनिल गौडे यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संम्पन्न झाले ।
न्यास द्वारा आगळा-वेगळा कार्यक्रम मराठी फूड फेस्टिवल अर्थात् उज्जैन जत्रा मराठी व्यंजना चा परिचय ह्या उद्देश्या ने हा कार्यक्रम आखला ह्यात मराठी आणि गैर मराठी हजारो लोकांनी मराठी व्यंजना चा स्वाद घेतला आणि मराठी लोकनृत्य लावणी ;प्रसिद्ध लावणी कलाकार माया जाधवद्ध यांचा कार्यक्रम चा आनंद घेतला तसेच नेत्रदान संकल्पित लोकांचे फार्म भरवुन मृत्यु उपरांत नेत्र उत्सर्जित करून इंदौर येथे अंध-बंधुंना लावण्यात आले । तसेच सिंहस्थ महापर्व मधे श्री ज्ञानदास जी महाराज, श्री सुधीर  दास जी महाराज मराठी संत यांचा सम्मान केला । डॉ. वी.डी. मुंगी सेवा प्रकल्प मधे नॉन मेडिसीनल साधन वाटर बेड, व्हील चेयर, नेबुलाइजर, स्टीक, स्ट्रेचर , हास्पिटल पलंग, बेडपेन इत्यादि नाममात्र च्या शुल्क वर सर्व समाजजनांना उपलब्ध करवीण्यात येते तसेच स्व. हरिभाऊ जोशी ह्यांच्या स्मृतित रूग्णवाहन ;एम्बुलेंसद्ध सेवेत उपलब्ध आहे ।