स्वर संवाद सांस्कृतिक एवम् साहित्यिक संस्था

समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी राजे यांना केलेला श्मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्रधर्म वाढवावाश् या उपदेशाचा आपल्या ब्रीद वाक्यरुपांत स्वीकारून समाज बांधवांना संगीतए नाटक इतर मनोरंजक कार्यक्रमाच्या माध्यमाने एकत्र आणून समाज संघटनाच्या बरोबर आपली मराठमोळी संस्कृति जतन करण्याचे प्रयत्न उज्जयिनीतील श्स्वर संवादश् ही संस्था करीत आहेण्
संस्थेचे अनौपचारिक संगठन सप्टेंबर २००८ मध्ये झालेण् स्वर संवाद या नावाखाली संगीत नाटक अकादमीए व उस्ताद अलाउद्दीन खां संगीत अकादमी यांच्या विप्लव गीतांच्या श्आजादी के तरानेष्ष् या कार्यक्रमांत जबलपूर येथे संस्थेची प्रथम संगीत प्रस्तुति देण्यात आलीण्
इंदूरयेथील सुप्रसिद्ध नाट्य संस्था श्सानंद न्यासश् सारखी एक संस्था आपल्या उज्जयिनीतही असावी अशी एक तळमळ उज्जयिनीच्या प्रत्येक रसिकाच्या मनात होती व अश्या संस्थेच्या स्थापनेचा प्रयत्न पूर्वी अनेक लोकांनी केला होता पण त्यांना यश लाभले नाहीण् या अपयशांच्या कारणांचे विश्लेषण करून शास्त्रीय संगीत आधारित हिंदी चित्रपट गीतांचा संगीत.नृत्यमय कार्यक्रम श्राग.रंगश्च्या माध्यमाने १ जानेवारी २०११ ला संस्था श्स्वर संवादश् नवीन रूपांत लोकांसमोर आलीण् श्राग.रंगश् या कार्यक्रमाचा हेतु केवळ मनोरंजन नव्हे तर उज्जयिनीतील रसिक वर्गाचा शोधए त्यांची रुचीए त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद इत्यादि मुद्दे पद्धतशीरपणे जाणून घेणे होते जेणेकरून श्सानंद न्यासश् सारखी देणगी उज्जयिनीच्या रसिकवर्गाला देता येईलण् श्रोत्यांनी श्राग.रंगश् ला दिलेला प्रचंड प्रतिसाद आणि त्यांनी संस्थेचे सभासदत्व मिळवायसाठी दाखविलेल्या इच्छेच्या बळावर पुणे येथील श्आनंदी.आनंदश् नाटकाच्या माध्यमाने १९ फेब्रुवारी २०११ रोजी स्वर.संवादने आपली विधिवत वाटचाल सुरु केलीण् श्आनंदी.आनंदश् नाटकाची घोषणा झाल्यावर अवघ्या १२ दिवसांत संस्थेला २५० सभासद लाभले आणि १६ मार्च २०११ रोजी संस्था श्स्वर संवाद सांस्कृतिक एवम् साहित्यिक संस्थाश् नावाने पंजीकृत झालीण् वर्षभराच्या आंत संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळए नवी दिल्लीशी संलग्न झालीण् उज्जयीनीच्या मराठी बांधवांची मातृ संस्थाए ष्महाराष्ट्र समाजष्ने दिलेल्या पहील्या हाकेला प्रतिसाद देऊन संस्थेने समाजाशी संलग्न होऊन आपली नैतिक जवाबदारी बजावलीण्

अवघ्या दोन वर्षाच्या अवधीतच संस्थेने श्री विक्रम गोखलेए डॉण्गिरीश ओकए सुश्री इला भाटेए
श्री चिन्मय मंडलेकरए श्री विजय पटवर्धनए श्रीमती कीर्ती शिलेदार इतर नामवंत कलाकारांची श्कथाश्ए यू टर्नए सुखांशी भांडतो आम्हींए तरुण तुर्क म्हातारे अर्कए संगीत मानापमानए रायगडाला जेव्हा जाग येते इतर गाजलेली नाटकेए तर श्री शरद पोंक्षेए आणि श्री हेमंत बर्वे यांचा श्स्वतंत्रते भगवतीश् व कवि श्री प्रवीण दवणे यांच्याशी मुक्त हृदय संवाद श्सावर रेश् सारखे आगळेवेगळे समाज.प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून लोकप्रियता मिळविलीण् आज संस्थेला जवळ.जवळ ४०० सभासद लाभले आहेत व नाट्यगृहात आसन संख्या मर्यादित असल्या.कारणाने सदस्यसंख्या देखील मर्यादित ठेवणे हा संस्थेचा नाईलाज आहेण् तरी यावर उपाय म्हणून येत्या वर्षभरातच सदस्य संख्या आणखी वाढवून प्रत्येक कार्यक्रमाचे दोन समूहांत प्रदर्शन करण्यासाठी संस्थेची धडपड सुरु आहेण् परमेश्वराच्या आणि मायबाप श्रोतृवर्गाच्या आशीर्वादाने संस्थेला उदंड आयुरारोग्य लाभो ही मंगल कामनाण्