संरक्षण व नवीनीकरण

समाजाची वास्तु देवस्थान गणपति मंदिर पानदरीबा हे स्व. गोपाळ गणेश शाहगड़कर यांनी महाराष्ट्र समाजास धार्मिक, सांस्—तिक व आध्यातिमक कार्यक्रमांसाठी स्वप्रेरणेने दान दिले. या वास्तु चा वर्ष 1964 साली मराठी भाषिक बंधू-भगिनीं च्या सहयोगा ने जीर्णोद्धार करण्यात आला. त्यात पहिल्या मजल्यावर लाकडी बल्ल्या आणि टीनाचे छत होते ते काढून लोखंडी पर्लिन आणि ट्रस टाकून नवीन टीन चे पतरे टाकण्यात आले. अधून-मधून भवनाचे व गाभारयाचे रंगरोगण करण्यात आले.

पुन:  सुमारे 47-48 वर्षांनी समाजाने मंदिर जीर्णोद्धार संकल्प योजनेला सुरवात केली आहे. नवीन स्वरूपामधे समर्थ सभागृहाचे छताचे पतरे बदलणे, फलोअरिंगचे कार्य, नवीन खिडक्या व दरवाजे लावणे, टायलेट ब्लाक नवीन बनविणे, स्वयंपाकघराचे नवीनीकरण, मंदिराच्या गाभारयाचे नवीनीकरण इत्यादि कार्य प्रस्तावित आहे. कार्यकारिणीस अपेक्षा आहे कि हया जीर्णोद्धार नंतर सर्व धार्मिक, सांस्कृतिक  व आध्यातिमक कार्यक्रमांच्या आयोजनांस व्यवसिथत स्वरूप येर्इल. तसेच येणारया 2016 च्या सिंहस्थ मेळाव्यात बाहेरून येणारया समाजबंधूसांठी क्षिप्रेच्या समीप योग्य व उत्तम व्यवस्था होउ शकेल. हया संकल्प कार्याची ए कूण कार्य योजना अंदाजे 9.5 लक्ष रू पयांची आहे.

आपणांस विनंती आहे कि हया जीर्णोद्धार कार्यास मुक्त हस्ताने तन-मन-धनाने सहयोग करावा.

तद्वेतच समाजाच्या अनवरत चालणारया शिक्षण प्रोत्साहन योजना (गरजू व होतकरू विधाथ्र्यांना शिष्यवृत्ती, प्रशिभाशाली व प्राविण्य सूचीत येणारया विधाथ्र्यांचा सम्मान कौतुक )  आणि चिकित्सा सहायता योजनांस ही आपल्या कडून भरघोस आर्थिक सहायय अपेक्षित आहे.

विनीत कार्यकारिणी-

डा. दिवाकर बेर्गे अध्यक्ष,

डा. अपर्णा जोशी उपाध्यक्ष,

अनिल ढमढेरे चिटणीस,

प्रभाकर पाध्ये, सुहास बक्षी सह चिटणीस,

जितेन्द्र आपटे कोषाध्यक्ष,

आनन्द केसकर वास्तु संयोजक,

श्रीमती जान्हवी केळकर, रविन्द्र पेंढारकर, अभय मराठे, आदित्य नामजोशी, डा. सौ. विधा जोशी, निलेश फडणिस, जयवंत श्योरपुरकर, नीललोहित पळशीकर  सदस्य