विशिष्ट व्यक्ति

शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा उज्जयिनीच्या मराठी माणसाला मिळाला आहे याची जाणीव परोपरीने होत असते अनेक पुरस्कार प्राप्त, साहित्यिक व कला साधक आपापल्या क्षेत्रात नामवंत राहिली आद्यापही आहेत महाराष्ट्र समाज उज्जयिनील त्यांचे अभिनंदन करण्यात व त्यांची माहिती देण्यात अभिमान वाटतो. थोडक्या शब्दात ही माहिती पुरविण्याचा प्रयत्न येथे करीत आहोत.                       :-

साहित्य-लेखक, कवि, वक्ते या रूपाने साहित्याची जोपासना करणान्याच्या श्रेय नामावळीत स्व. गजानन माधव मुक्तिबोध (हिन्दी कवि), स्व. के.ना.डांगे, स्व. माधवराव दाभाडे, ही आदराची स्थाने होती, अद्यापही इतिहास संषोधक डॉ. बा.ना.मुंडी, संस्कृत विद्वान डॉ. कृष्णषास्त्री कानिटकर, प्रा.डॉ.शषिकांत सावंत, प्रा.डॉ.वि.मा.पागे, प्रा.डॉ. सौ. अपर्णा जोषी, उज्जयिनीवासियांचे योग्य मार्गदर्षन करीत आहेत. तसेच व्हायलीन वादक कै. श्रीकृष्ण आपटे (कुशाभाउ आपटे) ह्यांना श्रीमंत महाराजा माधवराव सिंधिया ग्वालियर द्वारा श्री पं. श्रीकृष्ण आपटे को ‘‘विजया पुरस्कार‘‘ के निर्णायक हेतु सम्मान रजत श्रीमंत राजमाता विजयाराजे सिंधिया अर्द्धशताब्दी पुरस्कार देण्यात आले.

लिपिकार– अन्तर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त लिपिकार लक्ष्मण श्रीधर वाकणकर उपाख्य बापू वाकणकर वयाच्या उत्तरार्द्धात उज्जयिनीत साधनारत आहेत त्यांचे सानिध्य, कार्यकर्त्यास प्रेरणादेत आहे.

संगीत– 1978 साली नवी दिल्ली येथे 8 व्यां संगीत नाटकांच्या स्पर्धेत, बृहन्महाराष्ट्रातून एकमेव बक्षिस उज्जयिनी ला लाभले, संगीत दिग्दर्षक होते कै. कृष्णराव केतकर, अखिल भारतीय स्तरावर नामवंत गायकां बरोबर पेटीची संगत अप्रतिमपणे करण्यांत त्यांचे मानाचे स्थान होते वर्तमानांत, श्री विवके बन्सोड उत्कृष्ट संगतकार म्हणून ख्याती मिळवीत आहेत, शास्त्रीय गायनांत सर्वश्री सुधाकर देवळे (पं. अभिषेकी यांचे षिष्य), प्रभाकर देवळे, कल्पना हर्डीकर, लक्ष्मण राव वाकणकर, एकनाथ पांडे, गोपाळ आपटे, डॉ. सौ. अष्विना रांगणेकर, सौ. शुभदा जेजुरीकर, आणि ध्रुपद गायनांत उदय भवाळकर, मनोज सराफ संगीताचे सषक्त कार्यक्रम देत आहेत, तसेच सुश्री स्मिता शेण्डे, यांचे बासरी वादनांचे यषस्वी कार्यक्रम.

रंगमंच –     दूरदर्शन आणि सिने जगताला, श्री गोविन्द धर्माधिकारी, सौ. सुमन धर्माधिकारी, श्री विनायक चासकर सौ. कुमुद चासकर हे नामवंत कलाकार भारतीय रंगमंच उज्जैन या संस्थेने दिले आहेत, तसेच स्व. प्रा.वसंत उर्फ अप्पा केतकर हे नाटय क्षेत्रातले आदराचे स्थान होय. महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धा आणि बृहन्महाराष्ट्र नाटय स्पर्धा नवी दिल्ली येथे उत्—ष्ट दिग्दर्शन व उत्—ष्ट अभिनया साठी प्रशस्ती व सम्मान प्राप्त कलावंतानी उज्जयिनीस गौरवानिवत केले आहे. त्यांत सर्वश्री प्रा.रामदास शेण्डे, अविनाश गोखले, स्व. श्रीराम आळेकर, स्व. रमेश तुंगारे, स्व. जयंत देशपांडे, डा. सौ. अपर्णा जोशी, सौ. नलिनी तुंगारे, किरण हरणे, सुचित्रा कर्वे, डा. वसंत भागवत, सौ. वीणा भागवत, अनिल ढमढेरे, सौ. मृणालिनी रानडे ही प्रमुख नांवे आहेत, अधापही नवी नाटके सादर करून नाटय देवतेची सेवा घडत आहे. एकल अभिनय (मिमिक्री) चेप प्रयोग करण्यांत श्री अमोल अरोंदेकर यश संपादन करीत आहेत.

खेळ-व्यायाम–  पिळदार शरीर, सतत व्यायाम, कुस्तीचे फड जिंकणे या गुणांनी ओतप्रोत व्यकितत्व म्हणजे स्व. शामकांत हर्डीकर, माधव विष्णु साठे, ही उज्जयिनी मधील अभिमानाची स्थाने आहेत. स्व. अण्णा साहेब विपट यांच्या आशीर्वादाने मलखांब, शरीर सौष्ठा, जिमनासिटक, पोहणे अन्यान्य विषयांत, राज्य स्तरीय व अखिल भारतीय नैपुण्य प्राप्त खेळाडु उज्जयिनीला लाभले आहेत.

शरीर सौष्ठव–  प्रभाकर मुळे, भूषण केकरे मलखांब-विजय बाळ, लतिका वाळुस्कर, श्रुति कुळकर्णी, नम्रता भालेराव, लीना काळे जिमनासिटक- एन. आर. भावे (स्काउट), पदमाकर कवठेकर, शरद टिकेकर, शरद वाटवे, सुपेकर (राष्ट्रीय प्रशिक्षक) पोहणे- श्री दिलीप जोशी.

चिकित्सा– समाज सेवेच्या भावनेने कार्य करण्यात गुणवान मराठी चिकित्सक अग्रणी आहेत. लोक ज्यांना साक्षात धन्वन्तरी मानत असे डा. विष्णु मुंगी, डा. महाडिक (जगत बंधू), डा. एन.एम. सावंत, समाजाचे पूर्व अध्यक्ष डा. पी.बी. मुजुमदार, डा. नरेन्द्र खेर, हृदय रोग चिकित्सक डा. सुधीर गवारीकर, डा. विजय पेंढारकर, डा. श. ना. भौरास्कर, डा. नरेन्द्र महाडिक, महिला चिकित्सक सौ. शुभांगी मुजुमदार, सौ. शैलजा पेंढारकर, सौ. विजया तुंगारे.

वैदिक कार्य–   व्रतबंध, विवाह, पूजा अर्चा, इत्यादि धार्मिक कार्य सम्पन्न करण्या साठी या धार्मिक नगरीत मराठी विद्वान पुरोहित स्व. नागूजी हिंगे, स्व. —ष्णराव जोशी, कै. शंकरराव आपटे, स्व. भाउ सागरकर, स्व. लाखे यांच्या प्रखर विद्वत्तेस नगरवासी कधीच विसरू शकत नाही. सांम्प्रत सामक गुरूजी, वं. मू. मोरेश्वर दुराफे, हिंगे गुरूजी, पाध्ये गुरूजी, मोहाडकर गुरूजी (ज्योतिष निपुण) लोकांकडील कार्य संपादनांस आधार देत आहेत.

व्यवसाय क्षेत्र–  मराठी माणूस व्यवसायांत भाग घेत नाही या धारणेंस डावलून उज्जयिनीत मराठी माणसाने स्वकष्टाने, या क्षेत्रात मानाचे स्थान घेतले आहे. दासेन पिढयां पासून सोन्या चांदीचे व्यापारी हर्डीकर एण्ड सन्स, करंदीकर ब्रदर्स आज ही प्रतिष्ठा प्राप्त पेढी आहेत, तसेच सर्वश्री अविनाश निघोजकर, अशोक गुळजकर, रविन्द्र पेंढारकर, अरूण ऋषी, प्रदीप खडीकर, बलवंत जोशी, राजन गडकरी, दीपक बोरकर, रवि भिंडे, सौ. साधना उज्जैनकर, श्रीकांत वैशंपायन, रविन्द्र पाठक, मिलिंद वझे, ओगले बंधू, आदित्य नामजोशी, अजय भातखंडे, ढवळे बंधू, विनायक लपालीकर, नितिन गरूड, जितेन्द्र आपटे, अजीत कालकर, वझे इत्यादि अश्या अनेक मराठी व्यावसायिकांनी व्यवसाय क्षेत्रात अतुलनीय व्याप वाढ वलेला आहे.

समाजिक क्षेत्र– आपल्या कतर्ुत्वाने सामाजिक व राजनैतिक क्षेत्रात निस्पह पणे काम करण्यांत मराठी माणसाची कारकिर्द फार माठी आहे. कै. डा. पांडुरंग लक्ष् मण केळकर, कै. अड. गोविंद विश्वनाथ नार्इक, स्व. म.गो.जोशी, कै. शान्ताराम भवाळकर, कै. वंसतराव रायते, कै. नरहरि सप्रे, यांना जनमानसांत श्रद्धेने स्मरण केले जाते. साम्प्रत डा. नाबा देव मनोहर राव मोघे, बाबा सा. नातू, किर्तनकार जनार्दन बुवा काळे, सुश्री नलिनी रेवाडीकर, सुश्री इंदूतार्इ हेबाळकर, श्रीमती लक्ष् मीतार्इ वाकणकर, सुश्री कल्पना परूलेकर, सौ. हेमलता वर्तक, श्रीमती मालती आयाचित, आदरणीय नाना पित्रे तन, मन, धन ध्येयमार्गावर कार्य संपादन करीत आहेत.