अच्युतानंद गुरू आखाडा व्यायामशाला

व्यायाम क्षेत्रातील सगळया जुनी संस्था या संस्थेची स्थापना ग्वाल्हेरच्या स्व. दामोदर गुरू मोघे यांनी 4 जुलार्इ 1868 गुरू पौर्णिमेच्या दिवषी केली. मोघे हेच पुढे अच्युतानंद गुरू स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. यांनी वेताच्या मलखांबाचा प्रादुर्भाव केला गेल्या 131 वर्षा पासून ही संस्था अखिल भारतीय स्तरावर व्यायाम क्षेत्रात विधाथी्र तयार करीत आहे. 1956 साली गुरूवर्य काषीनाथ डकारे यांनी या संस्थेचे पंजीयन तयार केले. सध्या श्री वासुदेव डकारे यांच्या मार्गदर्षनात श्री विजय डकारे हे संस्थेचे संचालन करीत आहेत.