हौषी कलावंत सांस्कृतिक मंडळ

मराठी भाषा महाराष्ट्र बाहेर उन्नत रहावी, मराठी रंगमंच व रंगदेवतेची सेवा घडावी हया हेतुने हौस मनांत बाळगुन नाटयोपासने करिता एकत्र आलेल्या कलावंतांची ही संस्था. मंडळाने 1984 मधे ‘घालीन लोटांगण’ या हास्य नाटकाचा पहिला प्रयोग उज्जैन येथे सादर केला. नंतर महू, इंदूर, शाजापुर, नागदा, रतलाम, अजमेर असे क्षेत्र वाढत 1986 साली बृहन्महाराष्ट्र नाटय स्पर्धा नवी दिल्ली येथे दिलेला ‘कर्ता करविता’ हा नाटय प्रयोग गाजला. या षिवाय ‘मी अनिकेत सहस्त्रबुद्धे’ ‘वट वट सावित्री’, निर्णय तुमच्या हाती’ इत्यादि नाटयप्रयोग सादर केलेले आहेत. अखिल भारतीय स्पर्धेत मंडळास अनेक पारितोषिकही मिळाली आहेत. संस्थेचे संस्थापक- श्री अनिल ढमढेरे व श्री वसंत भागवत आहेत.

पता – आषिर्वाद 97, दसरा मैदान, उज्जैन