महाराष्ट्र परस्पर सहकारी समिति उज्जयिनी

उज्जयिनीच्या मराठी बांधवांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दिनांक 20-09-91 रोजी गणपति मंदिर पानदरीबा येथे महाराष्ट्र परस्पर सहकारी समिति मर्यादित उज्जयिनी ची स्थापना करण्यात आली. संस्थेचे प्रवर्तक स्व.म. गो. जोषी, स्व. अण्णा साहेब विपट, श्री ए. ग. वाघोलीकर, श्रीपाद परचुरे व इतर 19 ध्येयवादी मंडळीनी समिति प्रारंभ केली. वर्तमानात समितिचे 1250 सभासद आहेत. संस्थेची प्रारंभिक पूंजी 3662 रूपये होती आज संस्थेची संचित पूंजी 54,22,000.00 रूपये आहेत. संस्थेची अंष पूंजी 5 लक्ष रूपये आहे आणि एकूण वार्षिक व्यवसाय जवळ दो कोटी रूपयांचा आहे. समिति द्वारे सुवर्ण कर्ज, धान्य कर्ज, जमानती कर्ज, घर तारण कर्ज इत्यादि सुविधा दिल्या जात आहेत. समिति द्वारे लवकरच वाहन कर्ज, उपभोक्ता ऋण व व्यावसायिक कर्ज देण्याची योजना आहे वर्तमान समितिने आपले स्वत:चे नवीन कार्यालय ही विकत घेतले असून समितिच्या दोन शाखा चालु आहे. समितिच्या विकास यात्रेत श्री ए. ग. वाधोलीकर हयांची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी निरंतर 25 वर्ष सचिव राहून आपला अमुल्य सहयोग दिलेला आहे. वर्तमान अध्यक्ष- श्री गोपाळ महांळाल, सचिव- सुहास बक्षी.