बापु तात्या दत्त मंदिर दिक्षणी समाज न्यास

श्री दत्त मंदिराच्या उपासनेतून या न्यासची स्थापना 1907 साली संत श्रेष्ठ बापु तात्या रिसबुड यांच्या हस्ते झाली. न्यासाचे स्वत:चे मंदिर असलेली जागा 384 ग 80 वर्गमीटर आहे. न्यासाचा उददेष्य धार्मिक व सांस्—तिक असून गुरूवारी व एकादषीला भजन आणि नित्यपूजा अर्चन हे नियमित कार्यक्रम असून गुरूपौर्णिमा, दत्त जयंती, नृसिंह सरस्वती जयंती, वासुदेवानंद सरस्वती, श्री बापु तात्या पुण्यतिथि वगैरे अनेक उत्सव येथे उत्साहाने साजरे केले जातात. हयात मराठी भाषीयांचे एकत्रीकरण व धार्मिक कार्याची जोपासना केली जाते. जागृत स्थान असल्याने बाहरे गावचे भक्तजन येथे दर्षनाला सातत्याने येतात. त्यांच्या राहण्याचे सोय मंदिरात केली जाते. भविष्यात न्यासचा मंदिराची वास्तू वाढविण्याचा व जिर्णोद्धाराचा संकल्प आहे. हया करिता लागणारे 25 लक्ष रूपये भक्तांच्या देणगीतून उभारले जात आहे. अध्यक्ष श्री ए.ग.वाघोलीकर, कार्यवाह – श्री ग. मु. पेढारकर

पता-  बक्षी बाजार, लंगर निवासच्या समोर, उज्जैन