श्री भागवत धर्म सेवा पारमार्थिक, आध्यातिमक शैक्षणिक न्यास

इ.स. 1978 मध्ये श्रीमत सदगुरू गजानन महाराज, शेगांव या दिव्यविभूतीच्या प्रकटदिनाचा शतक महोत्सवी सोहळा महाराष्ट्रात व बृहन्महाराष्ट्रात साजरा होणार होता.  उज्जैनलाही समष्टीच्या स्वरूपात ती उपासना साकार करावी या हेतुने प्रा. वि. मा. पागे यांनी माध्यम होउन उज्जैन व इन्दूरच्या गुरूभक्तांच्या सहयोगाने हा उत्सव उत्साहाने साजारा केला. या सोहळयाच्या निमित्ताने जाणवले की उज्जैन येथील मराठी भाषीका मध्ये प्रामुख्याने अध्यातिमक आणि धार्मिक क्षेत्रात काम करणारया मराठी संस्थेची आवष्यकता आहे. याच विचारातून भागवत धर्मसेवा समिति ची स्थापना चैत्री पौर्णिमेला 1979 मध्ये झाली. इ.स. 1995 मध्ये याच समितिचे श्री भागवत धर्मसेवा पारमार्थिक, आध्यातिमक, शैक्षणिक न्यास मध्ये रीतसर रूपांतर झाले. आराध्य दैवत श्री सदगुरू गजानन महाराज हयांचे प्रमुख तीन उत्सव आणि प्रमुख मराठी संत पंचायतनाचे पाच उत्सव असे आठ उत्सव दरवर्षी सातत्याने सकाळ, संध्याकाळ उपासना चालू आहे. आध्यातिमक ग्रंथालय, परिचर्चा, प्रबोधन षिविर, संस्कार वर्ग अषा अनेक तन्हांनी समाजाची सेवा करण्याचा मानस न्यासच्या उददीष्टामध्ये आहे.

पता श्री गजानन महाराज मंदिर 11 अषोक विहार कालोनी, सार्इनाथ कालोनी जवळ, उज्जैन