सामाजिक/साहित्यिक/सांस्कृतिक कार्यक्रम

समाजात निर निराण्या प्रकाराचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.

  1. गणेश उत्सव
  2. टिळक पुण्य तिथि
  3. गुडी पाडवा / वर्धापन दिवस
  4. वार्षिकोत्सव व स्नेह सम्मेलन
  5. सांस्कृतिक नाट्य गायन कार्यक्रम
  6. वाद विवाद व लेखन प्रतियोगिता
  7. शिक्षण अनुदान योजना

एकवीसाव्या शतकात प्रवेष करण्या पूर्वी, महाराष्ट्र समाज उज्जयिनीने येथील मराठी बांधवांचे शारीरिक, शैक्षणिक, साहितियक संवर्धन व पोषण होत रहावे यास्तव नवे अनमोल उपक्रम आरंभिले आहेत.

शिक्षण अनुदान योजना– दानदात्यां कडून प्राप्त मुददती ठेवीच्या व्याजातून गरीब होतकरू विधाथ्र्यांना आर्थिक व शैक्षणिक सामग्रीची मदत केली जाते. समाजाची ही गंगाजळी उत्तरोत्तर वाढत आहे.

शिक्षण प्रोत्साहन योजना– निरनिराळया परिक्षेत उच्च स्थान मिळविणान्यां मराठी विधाथ्र्यांना वार्षिक पारितोषिक देउन जाहीर सन्मान करण्याचा प्रेरक उपक्रम आपल्या प्रिय व्यकितंच्या आठवणींत ”स्मृति पारितोषिका प्रित्यर्थ” प्राप्त मुददती रकमेतून साधला जातो.

चिकित्सा सहाय योजना- उज्जयिनीतील निरनिराळया क्षेत्रातून नि:षुल्क चिकित्सा षिविरे लावून शक्य तो नि:षुल्क उपचार लाभ मराठी बांधवास दिला जातो, या उपक्रमांत रक्तगत परिक्षण विषेष उल्लेखनीय आहे. या उपक्रमांस मराठी चिकित्सकांचे उदार अन्तकरणाने सहाय प्राप्त होते.

असिमता प्रकाशन – 1995 पासून महाराष्ट्र समाजाने ”असिमता” हे त्रैमासिक मुखपत्र सुरू केले. माळव्यातील इतर मराठी संस्थांचा परिचय व समाजाचा कार्यवृत्तांत सर्वांपर्यंत पोचविण्याचा मानस या माध्यमाने पूर्ण केला जातो व नवीन रचनाकारांना स्थान देउन प्रोत्साहित केले जाते. संपादक मंडळांत सौ. जान्हवी केळकर, सौ. अनिता ढमढेरे, सौ. वृन्दा काळे, विष्वास घोडगांवकर, हे आहेत.

ग्रन्थालय वाचनालय 1985 च्या मे महिन्यात महाराष्ट्र समाजाने टिळक स्मृति मंदिर येथे ”डा. वि.श्री. वाकणकर ग्रन्थालय आणि वाचनालय” सुरू केले, बृहन्महाराष्ट्रातीत नव्या पीढीला वाचनाची आवड उत्पन्न करण्याचा या मागे मुख्य हेतु आहे. श्रीमती उषा तार्इ गुमास्ते, सौ. रजनी भवे व श्रीमती सुधा तार्इ लोंढे साम्प्रत ग्रंथालयाचे काम व्यवसिथत रीत्या पहात आहे. सुमारे 425 पुस्तके घेउन ग्रंथालय सुरू केले गेले. बाल साहित्याची भर घालून, वाचनालयाची प्रगति साधावी असा प्रयत्न आहे.

योजना आणि अपेक्षा- विविध क्षेत्रातून समाजाचा व्याप वाढत आहे त्या पेक्षा ही जास्त लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत, रचनात्मक कार्यांच्या योजनेतील संस्कार केन्द्र, एक तासाची शाळा, विविध प्रषिक्षण वर्गे, मराठी प्र्यटकांसाठी राहण्याची सोय, सांस्—तिक नगरीतील अभाव दूर करण्यास रंगभावन (थियेटर) निर्माण करणे इत्यादि मुख्य मुददे आहेत, या साठी सर्व मराठी बांधवां कडून, या योजनां मूर्त रूपास याव्या म्हणून भरघोस आर्थिक सहायाची अपेक्षा आहे तद्वतच उज्जयिनीच्या मराठी बांधवांनी समाजाच्या सर्व कार्यक्रमांत उपसिथत राहून, वाचनालयचे व ”असिमता त्रैमासिकाचे अधिकाधिक संख्येत सभासदत्व ध्यावे, वैभवाच्या षिखरावर पोहचण्यास हातभार लावावा हीच अपेक्षा हेच निवेदन.