वास्तु व प्रकल्प

  1. टिळक स्मृति मंदिर, क्षीरसागर, उज्जयिनी दूरभाष – 556284
  2. औध्र्व दैहिक क्रिया कर्म स्थळ, श्री राम मंदिर जोगीपुरा, उज्जैन दूरभाष- 559065
  3. श्री गणपति मंदिर, पानदरीबा, उज्जैन

प्रकल्प योजना

  • असिमता प्रकाषन
  •  शैक्षणिक अनुदान योजना
  • वनिता मंडळ
  • रक्त परिक्षण रक्तदान
  • वाकणकर ग्रंथालय
  • चिकित्सा सहायता योजना
  • महाराष्ट्र समाज उज्जयिनीची 50 वर्षांची वाटचाल

श्री महांकाळेश्वरच्या वलय गाभारयात. संवतसराचे जनक महाराज विक्रमादित्यांच्या साम्राज्य परिसरात, पुण्यसलिला क्षिप्रेच्या काठावर महाकवि कालिदासांच्या अविनितकानगरीत 30 मार्च 1949 रोजी वर्ष प्रतिपदेच्या ध्येयादी मंडळींनी संस्थेला विधान संमत स्वरूप देण्यासाठी मध्यप्रदेष शासनाच्या व्यवस्थेत दिनांक 6 एप्रिल 1951 रोजी संस्थेची नोंदणी करवून घेतली. संस्थेजवळ स्वत:ची जागा नसल्याने विविध कार्यक्रमांसाठी अ.प्रा. व्यायामषाळा, चिटणीसांचे लक्ष्मीनारायण मंदिर, सोरटी यांचे राम मंदिर, भावे यांचे लक्ष्मी जनार्दन मंदिर, परसरामपुरीया धर्मषाळा, महाराजवाडा विधालय, रीगल थिएटर, देवासद्वार मराठी विधालय, षियासाफिकल सभागृह अषा अनेक संस्थानी सहकार्य दिलेले आहे. समाजाजवळ स्वत:ची जागा नसतानाही होलिकोत्सव, गणेषोत्सव, मकर संक्रमणोत्सव, छत्रपति षिवाजी जयंती, शरदोत्सव, टिळक पुण्यतिथि, वर्धापन दिवस, वार्षिकोत्सव, कालिदास स्मृति दिवस या सारखे अनेक कार्यक्रम उत्साही कार्यकारी मंडळ घडवून अणीत असे. जागेच्या अभावी कार्यकारी मंडळच्या बैठकी मंडळच्या सभासदांच्या घरीच होत असत. आता समाजाची स्वत:ची वास्तु असून मराठी संस्—तिच्या जोपासनेसाठी, प्रवचन, व्याख्यान, काव्यगायन, कीर्तन, गायन, वादन, नाटक इत्यादि कार्यक्रम अधापही होत असतात.

मैटि्रक पर्यंतच्या विधाथ्र्यांना शालेय षिक्षणाचे ज्ञान देण्यासाठी दर रविवारी विद्वानांतर्फे व्याख्यानाचा उपक्रमही समाजाने रावविला आहे. उज्जैन येथे महाविधालयात त्या वेळी इंटरच्या पुढेही मराठी विषय टिकविण्यासाठी समाजाने प्रयत्न केला असून त्यात यष मिळविले आहे.

समाजाच्या जागेसाठी निधि उभारण्यात भारतीय रंगमंच (लिटिल थिएटर), नाटयवंदना सारख्या अनेक संस्थांनी कार्यक्रमांच्या माध्यमाने सहायय केले आहे. ‘वन्दे मातरम’, ‘हमारा गाव’, ‘बडे बाप के बेटे’, ‘आंधळयांची शाळां’, ‘स्वामिनी’, ‘क्रांति के अग्रदूत’, ‘तुझे आहे तुजपाषी’, ‘भाग्योदय’, ‘भाभी’, ‘सांष्टांग नमस्कार’, ‘अयोध्या जाळी हनुमंत’, ‘मत्स्यगंधा’ अषा अनेक नाटकांचे प्रयोग स्थानिक व बाहेरील संस्थातर्फे सादर करण्यात आले आहेत.

1959 मधे चीनी आक्रमणा विरूद्ध भारत सरकार ने सिवकारलेल्या ख्ांबीर भूमिकेस समाजातर्फे पाठिंबा देउन राष्ट्रीय जागरूकतेचा परिचयही समाजाने दिला आहे.

1954 मधे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेषनात समाजाचे सभासद के.ना डांगे यांना बृहन्महाराष्ट्राचे मुखपत्र ”महाराष्ट्र विस्तार” चे संपादक नेमण्यात आले तसेच विष्वप्रसिद्ध पुरातत्वविद डा. हरिभाउ वाकणकर यांना पदमश्री, डा. —ष्णषास्त्री कानिटकर यांना ”राष्ट्रपति पदक” आणि अषाच अनेक विद्वानांच्या सत्काराने महाराष्ट्र समाजास गौरव निळवून दिला आहे.

स्माजातील होतकरू व गरजू विधाथ्र्यांना आर्थिक अभावामुळे षिक्षणात अडथळा येउ नये यासाठी ही एक योजना समाज रावबीत आहे. यासाठी विधाथ्र्यांच्या हितचिंतकांनी काही निधि स्थायी ठेव म्हीणुन दिली असून त्याच्या  व्याजातून विधार्थांना आर्थिक सहायय देण्यात येते. सुमारे 20 ते 25 विधार्थी या योजनेने लाभानिवत होत असून दरवर्षी या संख्येत वाढ होत आहे.

समाजाच्या वैधकीय सहायय योजनेच्या माध्यमाने येथील वेगवेळया क्षेत्रात नि:षुल्क आरोग्य तपासणी, रक्तगट, साखरधत अडथळा येउ नये यासाठी ही एक योजना समाज रावबीत आहे. यासाठी विधाथ्र्यांच्या हितचिंतकांनी काही रीच होत असत. आता समाजाची स्व, डोळे वगैरे तपासणी षिविरे लावण्यांत येथील मराठी चिकित्सक नि:षुल्क सहकार्य देतात. याच योजनेच्या अंतर्गत ”योग षिवीरांचे” आयोजन श्री पित्रे यांच्या नि:षुल्क मार्गदर्षनात करण्यात येते.

मराठीभाषी नवोदित लेखक, कवी यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतुने, समाजाची विविध माहिती मराठी व्यकितपर्यंत पोहचविण्यासाठी आणि मुख्यत्वे आमच्या बालपीढीने मातृभाषा टिकविण्यासाठी मराठी वाचन करावे या उददेष्याच्या पूर्ततेसाठी समाजाचे त्रैमासिक ”असिमता” मागील 4 वर्षापासून सतत प्रयत्नषील आहे.

समाजाच्या महिला विभागानेही समाजाच्या 50 वर्षांच्या वाटचालीत बाल मंदिर, षिवणाचे वर्ग, मुलींसाठी संगीत शाळा, सामुहिक मकरसंक्रांतिचा उत्सव व चैत्रगौरी हळदकुंकु, वटपौर्णिमा पूजन, मंगळागौरी पूजन, हरितालिका पूजन, कथा, कीर्तन, महालक्ष्मीचा खेळ, ज्ञानेष्वर महाराज पुण्यतिथि, गीता जयंती, वसंतोत्सव, राम—ष्ण परमहंस जयंती, स्नेह सम्मेलन, असे अनक कार्यक्रम समाजावर आर्थिक भार न टाकता आयोतित केलेले आहेत. समाजाचे स्वत:चे भवन असावे अषी आंतरिक तळमळ ठेवणारया कार्यकत्र्यांच्या प्रयत्नांना यष मिळाले व क्षीरसागर येथे असलेल्या टिळक स्मृतिमंदिर भवनाची जागा सन 1962 मधे विकत घेण्यात आली. त्या नंतर त्याच्या बांधणीसाठी कार्यकत्र्यांनी स्वत: फावडे व कुदाली चालवून याच्या उभारणीच्या पाया पक्का केला आहे. म्हणून आज आम्हाला 50 व्या वर्षात पदार्पण करणे शक्य झाले आहे. या भवनाच्या उभारणीसाठी उज्जयिनी येथील व बाहेरील अधिकांष दानदात्यांनी सढळ हाताने आर्थिक सहायय केले आहे. तसेच अपना पैसा समाजास साधारण व्याजाने वापरण्यास धावा असे आवाहन केले असता बरयाच व्यकितंनी या योजनेत आर्थिक सहाकार्य दिले व समाजाने अषा पैषाख्ी परतफेडही केलेली आहे. या भवनांत दोन मोठे सभागृह, 4 लहान सभागृह, 2 खोल्या, पटांगण, रंगमच व बाजूला, पटांगण, रंगमचव बाजूला दोन खोल्या, कार्यालयासाठी दोन खोल्या, दोन्ही मजल्यावर स्नान घरे व प्रात:विधिच्या सोयी असे बांधकाम पूर्ण केले असून हे टिळक स्मृतिमंदिर स्थानिक व्यकितंच्या मंगहकार्यात उपयोगासाठी डौलाने उभे आहे.

समाजाचे शुभचिंतक कै. गोपाळराव शहागडकर यांनी 1960 मधे पानदरीबा येथील गणपति मंदिर समाजास दान दिले. त्याचा जिर्णोद्धार करून एक लहान स्वयंपाकघर, शौचालय, न्हाणीघर, एक छोटी खोली, सभागृह, गाभारयाबाजूला एक खोली व पुढे एक लहान म्हणून समाजाने सोय करून दिली आहे.

समाजाचे आणखी कए शुभचिंतक कै. दत्तात्रय पर्लेकर यांनी 1964 मधे हरसिद्धिमंदिराच्या मागे योगीपुरा येथे श्रीराम मंदिर दान दिले आहे. येथील जीर्णोद्धार करून गाभारयापुढे सभागृह बाजूला एकूण 7 खोल्या, शौचालय, न्हाणीघर असे बांधकाम पूर्ण झालेले असून एक मोठे सभागृह बांधण्याचे कार्य प्रगतिवर आहे. कै. शंभूभैयया भवाळकर हे स्वत:, लोकांच्या औध्र्व दैहिक क्रियाकर्माची व्यवस्था व 13 व्या पर्यन्तचे सगळे कार्य स्वत:च्या घरी करत असत. ते वयोवृद्ध झाल्याने 1975 पासून हे पुण्य कार्य समाजाने आपल्या हाती घेतले. श्रीराम मंदिर येथे हे काय्र 1975 पासून सतत चालू आहे. औध्र्व दैहिक क्रियाकर्म सांगण्यासाठी छात्रवृतितच्या माध्यमातून ब्राहमण तयार करण्याची व्यवस्था समाजाने केलेली आहे. येथील वैदिक मंडळी या प्रषिक्षणासाठी सहकार्य देत असतात. येथे होणारे कार्य हे अत्यंत कमी खर्चात केले जाते. बाहेरून येणारया व्यकितंसाठी निवासाची सोयही या मंदिरातच केलेली आहे. जातिबंधन रहित, सनातन वैदिक हिंदु पद्धतीने कर्म करण्यास सर्व लोकांस परवानगी आहे. बाहेरगावी जाउन 13 वा करण्यासाठी (यजमानं कडून निमंत्रण) येथून ब्राहमण पाठविण्यात येतात.

परदेषांतून, बाहेर गावाहून, भारताच्या प्रत्येक भागातून, नाषिक, बनारस सारख्या तीर्थक्षेत्रातूनही आपल्या प्रियजनांचे कर्म करण्यासाठी त्याचे आहोष्ट येथे येतात. आतापर्यंत सुमारे 10000 लोकांचे कर्म करण्याचे पुण्य कार्य समाजातर्फे करण्यात आलेले आहे. संपूर्ण मध्यप्रदेषात आणि त्या बाहेतही इतकी सुलभ व्यवस्था कोठेही आढळत नाही. सन 1949 मधे स्थापन केलेल्या हया संस्थेच्या प्रत्येक कार्यकारिणीने आणि समाजाच्या कार्यकत्र्यांनी सतत प्रयत्नाने आम्हाला सुवर्ण दिवस सोहळा साजरा करण्याची संधि दिली आहे. सध्याच्या तरूणपीढी कडून अपेक्षा आहे की त्यांनी या संस्थेत सतत प्रगतिपथा नेत शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा योग आणावा.