समाजाची स्थापना

श्री महांकाळेश्वरच्या वलय गाभार्याता, संवत्सराचे जनक, महाराज विक्रमादित्यांच्या साम्राज्य परिसरांत, पुण्यसलिला क्षिप्रेच्या काठावर, महाकवि कालिदासांच्या अवन्तिका नगरीत अर्थात तीर्थक्षेत्री उज्जयिनीला 30 मार्च 1949 ला वर्ष प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर गुडी उभारून ‘महाराष्ट्र समाज उज्जयिनी‘ ची स्थापना झाली. ‘‘मराठा तितुका मेळवावा‘‘ या प्रतिद्धतेचे पुसेधा होउन सर्वश्री त्र्यं.दा.पुस्तके महादेव गोविंद जोषी, अण्णा सा. विपट, काका सा. वाघोलीकर, कृष्णराव बेर्गे, अेंड गोपाळ पंढरिनाथ हिरवे, के.ना.डांगे, बाबा सा. धर्माधिकारी, माधव विष्णू साठे वि.वा. आयाचित, पां. रा. तोर, दि.ना.डांगे आणि नाना सा. पित्रे या ध्येयवादी मंडळीनी 7 एप्रिल 1951 ला मध्यप्रदेष शासनाच्या व्यवस्थेत संस्था रजिस्टर्ड करून, विधान संमत स्वरूप् दिले. 1949 ते 1960 अनेकानेक गुणवंत कार्यकर्त्यांच्या युतीने सुमारे अकरा वर्षाचा काळ ‘‘महाराष्ट्र धर्म वाढवावा‘‘ हे ध्येय साधण्या साठी, कीर्तन, प्रवचन, नाटक, स्नेह सम्मेलन, परिसंवाद, व्याख्यान आदि कार्यक्रमांची मालिका उभारली, जागेच्या अभावाी हे कार्यक्रम व्यायामषाळा पटांगण, चिटणिस मंदिर पानदरिबा, मोदी धर्मषाळा, विक्रम लॉज, फ्रीगंज, मां साहेब धर्मषाळा देवास गेट इत्यादि निरनिराळ्या जागांमधून सातत्याने साजरे केले. शून्यातून संगठना निर्मिण्या, हे उदयाचे ‘‘मानकरी‘‘
ऋणी चिरंतन समाज यांचा, धन्य अवंती नगरी
प्रवाह पाउलांच-
1970 च्या दषकाची सुरूवात म्हणजे योजना मूर्तरूपास येण्याचा पर्वकाळच म्हणता येईल. उज्जयिनीच्या दाट मराठी वस्तीत, श्री शंकर गोपाळ शहागडकर यांनी गणपति मंदिर (पानदरिबा) उदार अन्तःकरणाने 1961 साली समाजास दान केले. मंदिराची अवस्था जीर्ण शीर्ण असली तरी मंदिराच्या रूपाने जणूं कार्याला श्रींचा अर्षीवाद लाभला आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आकाष ठेंगणे झाले आणि त्याचे सुपरिणाम-
1. क्षीसागर भागांत 8475 वर्ग फूट जागा घेतली गेली.
2. 1964 साली योगीपुरा क्षेत्रात श्रीराम मंदिराचा 2100 वर्ग फुटचा भूभाग स्व. श्री दत्तात्रय पेरलेकर यांच्या कडून दानात मिळाला.
3. 1965 साली गणपति मंदिर जीर्णोद्धार, धार्मिक कार्यांसाठी नव्याने बांधकाम झाले.
4. 1965 साली क्षीसागर जागेवर टिळक स्मृति मंदिराचा पायाभरणी समारंभ तत्कालीन राज्यपाल स्व. हरि विनायक पाटस्करयाच्या हस्ते झाला.
5. 1969 ते 1980 पर्यंत टिळक स्मृति मंदिर, श्रीगणपति मंदिर, श्रीराम मंदिर, सामाजाची ही भवनें डौलाने उभी राहिली आणि धर्मकार्य, संस्कृति कार्य, सेवा कार्य यांची जोपसना सुरू झाली, सुमारे अकरा वर्षांच्या या कालावधीत, चिकाटीने व धडाडीने ज्यांनी आपले श्रम पणास लावले ते समाजाच्या विस्तार कालावधीचे खरे पोषक कार्यकर्ते स्व. म.गो. जोषी आणि स्व. अण्णा सा. विपट यांच्या झंझावती नेतृत्वाने व प्रेरणेने साधनेत संलग्न झालेले प्रमुख कार्यरते सर्वश्री माधवराव जोगळेकर, दिनकर पाध्ये, कृष्णषास्त्री कानिटकर, इंजी.रविन्द्र ढोबळे, गोविन्द हिरवे, रामचंद्र पवांर, डॉ. अं.मा. पुस्तके, स्व. कृष्णराव बक्षी, डॉ.नरेन्द्र खेर, डॉ. पांडुरंग मुजुमदार, प्रा.पद्याकर आयाचित, डॉ. दिवाकर बेर्गे, स्व. पांडुरंग गाडगीळ, अविनाष निघोजकर, गणेष गुर्जर, विजय तेलंग आणि जया कारणें हृदयी ठसला, प्रवाह पाउलांचा रत्नगर्भा अवन्तिका
श्रीकृष्णाने सांदीपनिक्ष्या आश्रमांत ज्या पुण्य भूमीवर षिक्षण घेतले, महाकवि कालिदासांची जी कर्म भूमी आहे, अषा गुणीजन निपजणांन्या भूमीला मराठी माणसानें गर्व करावा अषी दिव्य रत्नेंही लाभलेली आहेत, गुण रत्नांचे वर्णन थोडक्यात करणे अषक्यच. त्यातील नवरत्नांचे स्मरण येथे करीत आहे.
1. माळव्याचे गांधी म्हणून लोक मनांत आदराचे स्थान पावलेले राज्य सभा सदस्य – कै.त्र्यं.दा.पुस्तके
2. खादि ग्रामोद्योग परिषदेचे अध्यक्ष मंत्री – कै.त्र्यंबक सदाषिव गोखले
3. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे मुखपात्र ‘‘महाराष्ट्र विस्तार‘‘ चे प्रधान संपादक, साहित्यकार- स्व. के.ना. डांगे
4. गोवा मुक्ति आंदोलनांत धारा तीर्थी देह ठेवून अमर झालेले-स्व. राजा भाउ महाकाळ
5. आर्कियोलॉजिस्ट व जग प्रसिद्ध पुरातत्ववेत्ता पद्म श्री स्व. हरिभाउ वाकणकर
6. सुप्रसिद्ध किर्तकार – ह.भ.प.स्व. चिंतामणि अप्पामार्जने, ह.भ.प. स्व. विनायक बुवा काळे
7. व्यायामाने तरूण पीढीला तयार करण्यांस आमरण व्रतस्थ- स्व. अण्णा साहेब विपट
8. व्यायामाच्या क्षेत्रांत माळव्याचे श्रद्धा स्थान-स्व. काषीनाथ गुरू डकारे
9. सुप्रसिद्ध शिक्षक , व्यक्तिगत जवाबदारीने क्रिया कर्माची व्यवस्था वर्षानुवर्षे करणारे-स्व. वासुदेव राव भवाळकर (गुरूजी)
कीर्ति स्तंभ अगणित आहेत, विद्वान व लोक प्रतिष्ठा प्राप्त मराठी माणसे यांनी उज्जयिनीची साहित्यिक व सांस्कृतिक गाथा भरलेली आहे. खरे सांगायचे तर-
सागरांतुन मौक्तिके ही वेचली ओवू कषी
थोडक्या शब्दात त्यांची थारेवी गाउ कषी
कार्य वर्णावे गुणांना जग जयासी ओळखे
नम्र अभिवादन तयांना हेच जमण्या सारखे
चौफेर चळवळीची संपदा
10. च्या दषकांत पूर्व पुण्याई व प्राप्त साधनांच्या जोरावर उज्जयिनीच्या मराठी समुदायाने अनेक क्षेत्रांत यष पातका रोविल्या, आपल्या श्रमाने व जिद्दीने, वसुधैव कुटुंबकम ह्या भावनेने समाजोपयोगी केन्द्रे उभारली, उज्जयिनीच्या नागरिकांना हे नजराणे अनंत काळ सुखावणांरे ठरतील.
1. सेवा  क्षेत्रांत- ‘‘अपंग सेवाश्रम‘‘ हा अनमोल उपक्रम उभारायला सर्वश्री डॉ. मराठे, डॉ.प्र.ना.डांगे, डॉ. नरेन्द्र खेर स्व. प्रा.राम मळगांवकर चन्द्रकांत प्रधान यांनी चिरस्मरणीय कार्य संपादिले.
2. स्हकारिता क्षेत्रात- उज्जैन परस्पर सहकारी पेढी (सध्या उज्जैन परस्पर सहकारी बैंक) साठी सर्वश्री भास्करराव भवाळकर, परषुराम रा. आपटे, दत्तूभया बिवरे, वेंगुर्लेकर सा. वैद्य, म.गो.जोषी पांडुरंग गाडगीळ यांनी अमाप श्रम घेतले?
3. महाराष्ट्र परस्पर सहकारी पेढी- श्री एकनाथ वाघोलीकर, अॅड श्रीपाद परचुरे यांच्या अथक परिश्रमाने मराठी माणसाला सहज मदतगार पेढी, अद्याप ही उत्कृष्टरीत्या कार्यरत असून बैंक होण्याचे मार्गावर आहे.
4. शिक्षण क्षेत्रात- लोकमान्य टिळक विद्यालय -मराठी माणसांनी आरंभ केलेली ही संस्था म्हणजे उज्जयिनीचे गौरवास्पद स्थान आहे- श्री हरिभाउ जोषी (पूर्व षिक्षण मंत्री, म.प्र.) यांच्या सषक्त मार्गदर्षनाचा लाभ घेत, उत्तरोत्तर प्रगति करणार्या या विद्यालयासाठी सर्वश्री डॉ. शरद भांड, राम मळगांवकर, दिवाकर नातू, प्रा.अणासाहेब बक्षी, पद्माकर खोचे, शरद चांदोरकर, पद्माकर काळकर, अषोक सोहनी आणि इतर अनेकांचे हातभार लागत आहेत.
5. शक्ति संपादन क्षेत्रांत-‘‘अच्युतानंद प्रासादिक व्यायामषाळा ‘‘संस्थापक त्र्यं.दा.पुस्तके, डिंगरे मास्तर, सदाषिव शुक्ल अणा सा. विपट, नाना सा. पित्रे, आणि ‘‘गुरूका अखाडा ‘‘संस्थापक अच्युतानंद स्वामी, बापट गुरूजी, प्रो. रेवाडीकर, माधवराव माधुस्कर, काषीनाष डकारे आणि महाराष्ट्रीय कार्यकर्त्यांनी ही दिव्य कामगिरी केली.
6. बृहन्महाराष्ट्रातील अद्वितीय प्रकल्प- सात मोक्षदायी तीर्थांत एक तीर्थ असल्याने आपल्या पितरांचे तर्पण कार्य व और्ध्व दैहिक कर्म करण्यास तीर्थ क्षेत्र उज्जयिनी चे महत्व आगळेच आहे, अनेक वर्षे भवाळकर गुरूजींनी व्यक्तिगत जवाबदारीने या कार्यात स्वताला जुंपले होते, 70 च्या दषकांत महाराष्ट्र समाजाने संस्थागत व्यवस्था मांडून जन सताधानाचा संकल्प घेतला, श्री राम मंदिर योगीपुरा येथे स्व. दत्तात्रय पेरलेकर ह्यांनी मृत्यु पत्रात दान केलेल्या जागेवर 1974 ते 1994 या वीस वर्षाच्या काळात क्रमाने मुक्ति मंडप, भक्ति मंडप, वसतिगृह, श्रीराम सभागृह, असे गरजेनुसार रक्कम बांधकाम केले सम्पूर्ण देषातून दानदात्यांचे परोपरीने होणारे सहाय, कार्यकर्त्यांनां प्रेरक झाले आणि एक अभिनव योजना मूर्तरूपास आली, या अलौकिक कार्याद्वारे शोक संतप्त बांधवांच्या भावनां हळुवार जपाव्या व अत्यंत माफक दरांत आप्तेष्टांचे अंत्येष्टि कर्म त्यांना करता यावे अषी समाधान कारक व्यवस्था महाराष्ट्र समाज उज्जयिनीने प्रयत्न पूर्वक रूजू केली त्याचे परिणाम म्हणजे.
1. विष्वस्त ब्राह्मणांच्या द्वारे ठाराविक दरांत हे कार्य करविले जाते.
2.  जाति बंधन रहित, सनातन वैदिक हिंदू तद्धतीने कर्म करण्यांस सर्व लोकांस परवानगी आहे. (कर्म सांगणारे पुरोहित षिष्यावृत्ती देउन समाजाने तयार केले आहेत).
3. समाजाच्या सम्पूर्ण नियंत्रण पहिला, तिसरा, नववा, दहावा, अकरावा व बारावा पर्यन्तच्या सर्व विधिंचे सामाना सकट दक्षिणा 1300 रू. घेतली जाते.
4. कर्म कारण्यांस आलेल्या व्यक्तींची राहण्याची उत्तम सोय सुद्धा मंदिर परिसरांत केली जाते.
5. निर्धन लोकां साठी पहिल्या दिवसा पासून सम्पूर्ण उत्तर क्रियेचा खर्च समाजा द्वारे केला जातो.
6. बृहन्महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किरवंत नसल्याने भडाग्नि देणे भाग पडते म्हणून समाजाने क्रिया, कर्म-काण्ड व इतर प्रषिक्षणांची व्यवस्था केलेली आहे. गरजू लोकांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यायला पाहिजे व षिक्षण घेउन आपल्या गावांत श्राद्ध कर्मा साठी उपयोगी पडायला पाहिजे.
7. भरणी श्राद्ध, पक्षश्राद्ध, वर्ष श्राद्ध, महालय श्राद्धा साठी कंत्राट दरात आपल्या गावी येउन कार्यभार उरकण्यास पुरोहितांची व्यवस्था पण केली जाते.
8.सेवेला  साध्य असावे, श्रद्धेने श्राद्ध साधावे ।
9. पुण्य ते पदरांत ध्यावे, तीर्थ क्षेत्री ।।